मोदींनी बायबलची प्रत मस्तकी लावली, अंध भक्तांनी आता काय करावे? शिवसेनेचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हॅटिकन सिटी येथे रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. मोदींनी पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. त्यावरुन आता सामनातून मोदी आणि मोदी भक्तांवर टीका करण्यात आली आहे. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता आणि शुद्धीकरण मोहिमा सुरु झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल असे शिवसेनेने म्हंटल.

पंतप्रधान मोदी पोप यांना नुसतेच भेटले नाहीत तर पोप यांनी भेट दिलेल्या बायबलची प्रत मस्तकी लावली. मोदी यांनी आपल्या या कृतीतून स्वदेशातील मूलतत्त्ववाद्यांना कठोर संदेश दिला. मोदी हे अचानक नवाज मियाँना भेटतात, पोप महाराजांनाही भेटतात, हे सर्व मोदींना शोभते. दुसरे कोणी हे सद्सदविवेकबुद्धीने केले असते तर हाय तोबा तोबा! राष्ट्र, धर्म, संस्कार, भ्रष्टच झाला असता व शुद्धीकरण मोहिमा सुरू झाल्या असत्या. अंध भक्तांनी आता काय करावे, हे मोदींनाच ‘मन की बात’मधून सांगावे लागेल,” असा उपहासात्मक टोला लेखातून लगावण्यात आलाय.

मोदी आणि पोप यांच्यात गरिबी निर्मूलनावर चर्चा झालीच असेल तर आपल्या देशातील गरिबी निर्मूलनाबाबत पंतप्रधान मोदी यांनी पोपसाहेबांना नक्की कोणती माहिती दिली? मोदी आणि पोप यांच्यात चर्चा सुरु असतानाच इकडे ‘मनरेगा’ म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आर्थिक खडखडाट झाल्याचे वृत्त समोर आले. योजनेसाठी असलेला पैसा संपला असून या योजनेवर काम करणाऱया मजुरांची दिवाळी अंधारातच जाणार, असे चित्र निर्माण झाले आहे. देशातील 21 राज्यांत ‘मनरेगा’चे काम चालत असते.

2020-21 मध्ये 7.75 कोटी कुटुंबांना या योजनेंतर्गत काम आणि रोजगार मिळाला. आता ही योजनाच आर्थिक संकटात सापडल्याने हिंदुस्थानातील गरीबांवर मोठेच संकट कोसळले आहे. पोप आणि मोदी भेटीत गरिबी निर्मूलनावर चर्चा झाली म्हणून मनरेगाचा प्रश्न आम्ही येथे मांडला. हिंदुस्थानातील शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी एक वर्षापासून लढत आहेत. त्या गरीब शेतकऱयांना चिरडून ठार मारण्याचे अघोरी प्रयोग झाले. गरिबी निर्मूलनाच्या जागी गरीबांचेच निर्मूलन करावे, अशी ही योजना दिसते. महागाईच्या वणव्यात गरीब होरपळला आहे. हिंदुस्थानची लूट करून उद्योगपती, नोकरशहा परदेशात पळून जात आहेत. अशाने मोदींच्या देशात गरिबीचे निर्मूलन कसे होणार? पोप यांच्याही मनात हे सर्व प्रश्न असणारच आणि पोप यांच्याबरोबरच्या चर्चेत गरिबी निर्मूलनाबाबत मतप्रदर्शन झालेच असणार. पंतप्रधान मोदी आणि पोपसाहेबांची भेट ऐतिहासिक असल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नड्डा यांनी सांगितले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, ‘मोदी-पोप भेट इतिहासाच्या पुस्तकात नोंद करण्यासारखी आहे. शांतता, सौहार्द आणि परस्पर संवादाच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे असे शिवसेनेनं म्हंटल.

Leave a Comment