प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणूकीने राजकारण तापलं असून भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट सामना लढणार आहे. दरम्यान ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप कडून हल्ला करण्यात आल्यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर ताशेरे ओढत आपला पाय अजून खोल कसा गेला हे सुचोवात केले आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना हिंमत असेल तर नंदीग्राममधून आपल्याविरुद्ध निवडणूक लढवून दाखवा, असे आव्हान देताच ममता बॅनर्जी यांनी वाघिणीप्रमाणे भक्ष्यावर झेप घेतली व नंदीग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात निवडणुकीचा अर्ज भरला. अशी हिंमत ज्या वाघिणीमध्ये आहे तिच्यासमोर कुणाचा निभाव लागणार? ममतांच्या लंगड्या पायास भाजपवाले घाबरले ते त्यामुळेच अस शिवसेनेने म्हंटल आहे.

ममतांच्या पायाला इजा झाली हे बरोबर. त्यांच्या पायाला प्लॅस्टर पडले हेही खरेच. मात्र त्या प्लॅस्टरच्या सी.बी.आय. चौकशीची मागणी हा प. बंगाल निवडणुकीतील सगळ्यांत मोठा विनोद म्हणावा लागेल. प्लॅस्टर ममतांच्या पायाला, पण चिंता भाजपला. ममतांच्या पायास पडलेले प्लॅस्टर भाजपच्या किमान दहा-वीस जागा नक्कीच जखमी करू शकते. भारतीय जनता पक्षाने प. बंगालात सर्व शक्ती पणास लावली आहे. ममतांची कोंडी करण्याचा हरएक प्रयत्न सुरू आहे. ममतांचा पक्ष रोज फोडला जात आहे. तरीही ममतांचा प. बंगालातील जोर कायम आहे. प. बंगालातील लढाई ही ममता विरुद्ध नरेंद्र मोदी अशी झाली आहे. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष प. बंगालात काय घडतेय याकडेच लागले आहे.

प. बंगालसारख्या मोठय़ा राज्याची निवडणूक जय श्रीराम, चंडी पाठ, ममतांच्या पायाचे प्लॅस्टर याभोवतीच फिरत आहे. हे आपल्या लोकशाहीचे विद्रुपीकरण आहे. ममतांच्या पायास जखम झाली. आता त्याच अवस्थेत लंगडत किंवा हातात कुबड्या घेऊन कार्यकर्त्यांच्या आधाराने ममता बॅनर्जी प्रचार करतील व सहानुभूती मिळवतील याची भीती भाजपला वाटत असेल तर भाजप हा तकलादू मुद्द्यांवर प. बंगालच्या मैदानात उतरला आहे. पंतप्रधान मोदींनाही अधूनमधून हुंदके फुटतात. अश्रूंचा बांध फुटतो, ते बरे चालते.अस म्हणत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केले.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment