नाशिकमध्ये भुजबळ पिता-पुत्रांना लक्ष्य करण्यासाठी शिवसेनेने आखली मोठी ‘रणनीती’  

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी। जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर निवडणूक लढवत असून, या ९ जागांवरील प्रचाराचे नियोजन शिवसेनेकडून पूर्ण झाले आहे. शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी, १२ ऑक्टोबर रोजी दिंडोरी, नांदगाव आणि येवला मतदारसंघांत जाहीर सभा घेणार आहेत. नांदगाव आणि येवल्यात सभा ठेवून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेनेने भुजबळ पिता-पुत्रासमोर दंड थोपटले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या माघारीनंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, राजकीय पक्षांकडून बड्या नेत्यांच्या सभेचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. शिवसेनेने जिल्ह्यातील ९ मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रचाराचे नियोजन केले आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे शनिवारी जिल्ह्यात ठाण मांडणार आहेत. पहिली सभा दिंडोरी मतदार संघात दुपारी एक वाजता होणार आहे. तेथे शिवसेनेचे भास्कर गावित उमेदवार आहेत. त्यानंतर ठाकरे हे नांदगावमध्ये उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी दुपारी ३ वाजता सभा घेणार आहेत.

त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता येवल्यात उद्धव ठाकरेंची तिसरी सभा होईल. तेथे संभाजी पवार यांनी छगन भुजबळांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. त्यानंतर ठाकरे नाशिकमध्ये मुक्काम ठोकणार आहेत. नाशिक शहरातील तीनही मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. त्यमुळे त्यांची शहरात सभा होणार नाही. देवळाली आणि इगतपुरी मतदारसंघ ग्रामीणमध्ये येत असल्याने या मतदारसंघातही सभा टाळण्यात आली आहे.

इतर काही बातम्या-