नारायण राणे म्हणजे बेरोजगार राजकारणी ; गुलाबराव पाटील राणेंवर बरसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी बोचरी टीका नारायण राणेंनी केली होती. याबाबत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना विचारल असता “नारायण राणे हे बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते काहीही बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही. त्यांना त्यांच्या भारतीय जनता पक्षातही कुणी काम देत नाही. त्यामुळे ते असं काही तरी बोलतात. याऐवजी त्यांनी सांगावे की ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले?” असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.

खरं तर नारायण राणे याना शिवसेनेने मोठं केलं.शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात असही गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

नारायण राणे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर नारायण राणेंनी ताशेरे ओढले होते. उद्धव ठाकरे एका मंत्र्याला वाचवू पाहात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं होतं. याच वेळी त्यांनी नाणार हा शिवसेनेचा पैसा कमवण्याचा धंदा असल्याचंही वक्तव्य केलं होतं.

Leave a Comment