हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाले आणि कोकणावर अतिवृष्टीसह महापूराचे संकट आले. त्यामुळे खर्या अर्थाने नारायण राणेच हे पांढर्या पायाचे मंत्री असल्याची टीका शिवसेनेचे मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांढऱ्या पायाचे म्हंटल होत. त्यावर शिवसेनेने प्रत्युत्तर दिले.
गुलाबराव पाटील म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यानेच ते मंत्री झाल्यामुळे कोकणवर ही आपत्ती कोसळली. आरोप-टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा हा रिकामा असतो. मात्र, आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे हेच लोकप्रतिनिधींचे पहिले कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. तेव्हा नारायण राणे यांनी अशा आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी म्हंटल.
राणे नेमकं काय म्हणाले होते –
रविवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे कोकणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून प्रत्येक संकट महाराष्ट्रावरच येत आहे. त्यामुळे ठाकरे हे पांढर्या पायाचे असल्याचा आरोप राणेंनी केला होता.