कल्याण : हॅलो महाराष्ट्र – सध्या पोलिसांनी ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी (vijay salvi) यांना तडीपारची नोटीस दिली आहे. यामध्ये पोलिसांनी साळवी (vijay salvi) यांना विचारले आहे की, ‘ ठाणे मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून तुम्हाला दोन वर्षासाठी तडीपार का करण्यात येऊ नये?’ या कारवाईनंतर साळवी यांनी या कारवाईला कायदेशीर उत्तर देणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
https://www.facebook.com/vijay.salvi2/posts/5335276466520948
या नोटीस मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, महात्मा फुले चौक, बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजी चौक, कल्याण पश्चिम तेजस्वी बिल्डिंग च्या कार्यालयाजवळ तसेच भाजप शहर कार्यालय, अहिल्याबाई चौक, लाल चौक, खडकपाडा या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी साळवी (vijay salvi) यांनी अपराध केल्याचे सांगत अजूनही ते अपराध करीत आहेत असे नमूद केले आहे.
एवढेच नाही तर या नोटीस मध्ये पुढे असे लिहिण्यात आले आहे की, ‘तुमचे गुन्हेगारीचे क्षेत्र हे महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातील आजूबाजूचा परिसर आहे. जर तुम्ही ठाणे मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या कोणत्याही भागात राहिलात तर गुन्हेगारी हालचाली आणि कारवाई केल्याशिवाय नाही राहणार. त्यामुळेच या तिन्ही जिल्ह्यातून तुम्हाला (vijay salvi) हद्दपार करण्याचे प्रास्ताविक केल्याचे नोटीसमध्ये लिहिले आहे.
हे पण वाचा :
वेदांतानंतर आता फोन पे महाराष्ट्रातून बाहेर पडणार
आकाशात विमान झेपावताच विमानातून उडाल्या ठिणग्या, Video आला समोर
टेलिकॉम कंपन्यांच्या ‘या’ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून आणखी एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द !!!
‘या’ 2 बँकांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठीची एफडी योजना 1 ऑक्टोबरपासून बंद होणार