दीपाली सय्यद यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; भाजप नेत्यांची केली तक्रार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप होत आहेत. भाजप नेत्यांकडून सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीत राज्यातील भाजप नेत्यांची तक्रार केली आहे. तसेच मोदींनी गेल्या 25 वर्षांच्या युतीचा आणि शिवसैनिकांचा विचार करून आपली भूमिका मन की बातममधून स्पष्ट करावी असेही त्यांनी म्हंटल.

माननीय श्री. नरेंद्र मोदी साहेब.

पंतप्रधान भारत सरकार.

विषय: महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमार्फत मुख्यमंत्री व त्यांच्या कुटूंबावर वारंवार होणार्या अपशब्द, खालच्या पातळींवर होणार्या आक्षेपार्य विधानांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत….

माननीय महोदय,

गेले दहा महिन्यापासुन महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांमार्फत माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे व त्यांच्या कुटूंबावर वारंवार होणार्या अपशब्द, खालच्या पातळींवर होणार्या आक्षेपार्य विधानांबाबत आपणांस माहीती देऊ इश्चिते कि भाजपाचे नेते किरीट सोम्मया, आमदार आशिष शेलार, अमृता फडणवीस, आमदार अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील व भाजप पाठींबा करत असलेली अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे पती हे वारंवार जाणून बुजून मुख्यमंत्री व त्यांच्या कुटूंबावर खालच्या पातळींवर आक्षेपार्य विधाने करीत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेना हि आरे ला कारे करणारी संघटना आहे तरी याबाबतीत भाजप नेत्यांच्या प्रतिक्रीयेला उलट प्रतीउत्तर देण्याकरीता खुद्द देशाच्या पंतप्रधानांवर आम्हाला जशास तशी टिका करावी लागत आहे. त्याचे कारण असे कि या सर्व भूमिका आपल्या मार्गदशनाने घडवल्या जात आहेत असा संदेश महाराष्ट्रातील जनतेकडे किंवा शिवसैनिका पर्यंत पोहचत आहे तरी भारताचे पंतप्रधान आपण असुन सुद्धा आपल्यावरती टिका करणे किंवा जशास तसे उत्तर देण्यासाठी आपले आम्हाला नाव घ्यावे लागते

या सर्व वर्तवणुकीमुळे बरेच आंदोलन व पोलिस तक्रार, खटले, जिवे मारण्याच्या धमक्या इत्यादी गोष्टींना सेना भाजप कार्यकर्त्यांना नेत्यांना सामोरे जावे लागत आहे व या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडत आहे तरी आपण गेल्या २५ वर्ष युतीचा व शिवसैनिकांच्या भावनांचा विचार करून तात्काळ आपली भूमिका सर्व गोष्टींना पाठिंबा देते का हे “मन कि बात” याद्वारे व पत्राद्वारे स्पष्ट करावीत. आपली प्रतिक्रिया हि महाराष्ट्राच्या सुव्यवस्थेला वेगळे वळण देणारी असेल आपण यांवर प्रतिक्रिया न दिल्यास हे असेच चालु राहुन कायदा व सुवस्था बिघडु शकते या मध्ये महाराष्ट्राचे नुकसान लक्षात घेऊन माझ्या पत्राची काळजीपूर्वक दखल घ्यावी हि नम्र विनंती.

आपली विश्वासु

दिपाली भोसले सय्यद.

Leave a Comment