जळगाव । एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ”खडसेंप्रमाणे, आता पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या पाहिजेत. म्हणजे राजकारणात मजा येईल,” अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
गुलाबराव पाटील हे आज दुपारी जळगावात होते. येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणावर होणारे दूरगामी परिणाम, भाजप नेत्या पंकजा मुंडे, बिहार विधानसभा निवडणूक अशा विविध विषयांवर मते मांडली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, ”शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे मुंडे परिवाराशी जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक संबंध राहिले आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी भाजप-सेनेत युती घडवून आणली होती. 2014 मध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे भाजपच्या उमेदवार होत्या. तेव्हा शिवसेनेने त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. युती असतानाही आणि युती नसतानाही शिवसेनेने मुंडे कुटुंबासोबतचे नाते जोपासले आहे. त्यामुळे आता एकनाथ खडसेंप्रमाणे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला पाहीजे, म्हणजे राजकारणात मजा येईल.” (Gulabrao Patil says Pankaja Munde should join Shiv Sena then politics will change)
नाथाभाऊ काय चीज आहे, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ'; शरद पवार यांचा विरोधकांना थेट इशारा
वाचा सविस्तर -👉 https://t.co/HdzjaVhrl3@NCPspeaks @MumbaiNCP @PawarSpeaks @EknathGKhadse #HelloMaharashtra— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 23, 2020
ठाकरे सरकारच्या १० हजार कोटींच्या पॅकेजमधून शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत
वाचा सविस्तर -👉 https://t.co/hvaoBkyOFt
@CMOMaharashtra @ShivSena @NCPspeaks #MaharashtraRains #maharashtrarains— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 23, 2020
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in