राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात याकडे आमचंही लक्ष – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पूर्वीचे सहकारी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी नक्की त्यांना लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात याकडे आमचंही लक्ष असेल, अशी घोचक टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर केला. तसेच, पक्षानेही नाथाभाऊंना खूप काही दिलं आहे त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची गरज नव्हती, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकनाथ खडसेंवरही टिका केली.

नाथा भाऊंवर जो अन्याय झाला त्यावर अनेकदा त्यांच्याशी चर्चा झाली. नाथा भाऊंना पक्षानेही खूप काही दिलं. त्यामुळे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे त्यावर काही ना काही तोडगा निघाला असता. आता जयंत पाटील काय देतात ते बघुया”, असं म्हणत त्यांनी जयंत पाटलांवर टीका केली.

“2 वाजताचा प्रवेश 4 वाजेपर्यंत का लांबला हे जयंत पाटलांनी स्पष्ट करावं. तुमच्याकडेच अजून त्यांना काय द्यायचं हे ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ अशावर शेवटी नाथा भाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल यामध्ये लिमलेटची गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही समाधान होतं. त्यामुळे आता त्यांना तो लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात? आणि त्यावर मनापासून समाधानी होतात नाथा भाऊ की आता काही पर्यायच नाही म्हणून जे देतील त्याच्यावर समाधानी आहेत असं म्हणतात, हे पाहावं लागेल”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी आणि खडसेंवर निशाणा साधला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’