सोलापूर प्रतिनिधी | राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र अथवा कायमचा शस्त्रू असू शकता नाही. याचीच प्रचिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणावरून येऊ लागली आहे. सेना भाजप मध्ये सहभागी होण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत. तर भाजपमध्ये नेते आणण्यात मोलाची भूमिका बजावणारे गिरीश महाजन भाजपमध्ये नेते सामील करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत आले. अगदी तशीच भूमिका सध्या शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत बजावत असल्याचे दिसते आहे.
मोहिते पाटील यांच्या गटाचे नारायण पाटील करमाळ्याचे शिवसेना आमदार आहेत. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी हि मराठी म्हण प्रचलित आहे. मात्र नारायण पाटील यांचा खाक्या जरा वेगळाच आहे. शिवसेनेची खावी पोळी आणि मोहिते पाटलांची वाजवावी टाळी असा त्यांचा पवित्रा आहे. त्यामुळे त्यांच्या थाळीत विधानसभा उमेदवारीची पोळीच पडू द्यायची नाही असा इरादा तानाजी सावंत यांनी बांधला. याच राजकीय द्वंधवाला इलाज म्हणून त्यांनी राष्ट्रवादीत नाराज असणाऱ्या माजी आमदार माजी मंत्री यांच्या कन्या रश्मी बागल यांना शिवसेनेत घेतले. त्याच प्रमाणे बार्शीची जागा शिवसेनेची मात्र तेथे राजेंद्र राऊत भाजपमधून तयारी करत आहेत म्हणून त्यांचा ‘इस्तू इजवण्यासाठी’ दिलीप सोपल यांनाच शिवसेनेत घेण्याचा डाव आखला. त्यात ते यशस्वी देखील झाले. कारण शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे दिलीप सोपल २८ ऑगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
उत्तर सोलापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांना काँग्रेस सोडायला देखील तानाजी सावंत यांनी भाग पाडले असून ते सुद्धा येत्या काही दिवसात शिवसेनेत दिसणार आहेत. मानेंच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपचे मंत्री सुभाष देशमुख आणि दिलीप माने यांच्यात तिकिटासाठी चुरस बघायला मिळणार आहे. एकंदरच सोलापूर जिल्ह्यात येत्या निवडणुकीला शिवसेनेचा एकसुद्धा आमदार निवडून येणार नाही. त्या जिल्ह्यात शिवसेनेचे किमान चार आमदार निवडून आणण्याची शक्यता तानाजी सावंत यांनी निर्माण केली आहे.