पंढरपुरात शिवसैनिकांची मुख्यमंत्री फडणवीस, दानवेंविरोधात घोषणाबाजी

Shivsena sabha in Pandharpur
Shivsena sabha in Pandharpur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पंढरपूर | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या पंढरपूर दौऱ्यावर आहेत. ‘२४ डिसेंबर रोजी पंढरपूरमधे शिवसेनेची एतिहासिक सभा होईल आणि अनेक जण यावेळी शिवसेनेत प्रवेश करतील’ असा दावा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत केला होता. या पार्श्वभुमीवर राज्यभरातील शिवसैनिक आज सकाळ पासूनच पंढरपूरात गर्दी करु लागले आहेत. यावेळी सभेसाठी आलेल्या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचे समजत आहे. यामुळे सभेच्या ठिकाणी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अयोध्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांचा पंढरपूर दौरा महत्वाचा मनाला जात आहे. पंढरपूर दौऱ्यातून शिवसेना शक्तीप्रदर्शन करणार असल्याने या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. आपल्या भाषणात ठाकरे राम मंदिराचा मुद्दा बोलणार की भाजप विरोधात स्वबळाचा नारा देणार हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. अशात ‘अयोध्येत राम मंदीर बांधण्याचे नारे’ कार्यकर्त्यांनी दिल्याचे समजत आहे. इतकेच नाही तर ‘रावसाहेब दानवे यांचं करायचं काय, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणदणून सोडला.

आज सायंकाळी ४ वाजता उद्धव ठाकरे यांची चंद्रभागा बसस्थानक आवारात भव्य सभा होणार आहे. दरम्यान या सभेसाठी पंढरीत शिवसेनेचे अनेक वरिष्ठ नेते, राज्य मंत्री मंडळातील मंत्री दाखल झाले आहेत. तसेच सभेसाठी महाराष्ट्राच्या कानाकौर्यातून अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली आहे.

ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातला याराना तुम्हाला माहीती आहे का?

मोदींनी देशात आणीबाणी घोषित करावी – शिवसेना

मुंबईतील या प्रमुख स्थानकांची नावे बदलणार, शिवसेनेचा प्रस्ताव