हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांची ईडी कडून तब्बल 8 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मानले जात असून ते मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या कुटुंबियांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली असून गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या जमीन खरेदी व्यवहाराबद्दल त्यांनी ३ मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. याच पार्श्वभूमीवर चौकशी झाल्याचे समजत आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सातत्याने ईडी कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. अनिल परब, अनिल देशमुख, एकनाथ खडसे, भावना गवळी तसेच आनंदराव अडसूळ असे बडे नेते ईडी च्या रडारावर आहेत.