हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या काल घडलेल्या घटनेबाबत त्यावर भाजपकडून केलेल्या प्रकाराबाबत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ““मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. यापुढेही ठाकरे सरकारमध्ये कायद्याचे राज्य चालणार आहे. यापुढच्या काळातही कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घेण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये असल्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे.
भाजप व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबाबत आमदार नाईक यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हंटले आहे की, मी केंद्रीय मंत्री आहे माझं कोणी काही करू शकत नाही अशा अविर्भावात राहणाऱ्या नारायण राणेंना कायदा काय असतो हे कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या पुढे कोणीही नेता, मंत्री मोठा नाही हे ठाकरे सरकारने दाखवून दिले. शिवसेनेची रस्त्यावरची ताकद नारायण राणे व त्यांच्या मुलांनी आज अनुभवली आहे.
https://www.facebook.com/100007474727202/videos/344476250670685
गेले कित्येक दिवस शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या, शिवसेनेवर विनाकारण टीका करणाऱ्या, शिवसैनिकांना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना आज शिवसैनिकांनी अद्दल घडविली आहे. शांत असलेली शिवसेना वेळप्रसंगी रौद्र रूप धारण करू शकते. यापुढच्या काळातही कोण अंगावर येत असेल तर शिंगावर घेण्याची ताकद संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये आहे. यापुढेही कोण अंगावर येत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाणार आहे.