हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आणि शिंदे गटाशी जुळवून घ्या अशी मागणी शिवसेना खासदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक पार पडली. यावेळेस खासदारानी ही भूमिका मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेणार हे पाहायला हवे.
देशात भाजपने मोठी ताकद निर्माण केली आहे त्यामुळे आपण त्याच्या सोबत राहिलं पाहिजे अस मत खासदारांना मांडल. एकनाथ शिंदे यांच्यासह असलेलं 50 आमदार आजही मनाने आपलेच आहेत त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेतलं तर भविष्यात पक्षाचं हिताचं होणार होईल असे आमदारांनी म्हंटल.
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा अशी भूमिका काही खासदारांनी घेतली अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील असेही राऊत म्हणाले. शिवसेनेने यापूर्वी देखील राजकारणापलीकडे जाऊन राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय अस सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.