हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आज शिवसेना खासदार संजय राऊत भरभरून बोलले. बाळासाहेब ठाकरे हे शतकातून एकदाच घडतात अस म्हणत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना विनम्र अभिवादन केले.
संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे शतकातून एकदाच घडतात. देशात हिंदुत्वाची जी लाट निर्माण झाली, त्याचे श्रेय बाळासाहेबांना जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसाला लढण्याचं बळ आणि प्रेरणा दिली. त्यांच्यामुळे आज मराठी माणूस उभा आहे.आज देशात मराठी माणूस अनेक ठिकाणी आहे. त्याचे श्रेय बाळासाहेबांना आहे. बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं. यापुढेही मराठी माणूस अनेक शतकं त्यांचे स्मरण करत राहील असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला. महाराष्ट्रात आज जो भाजप आहे. त्याचं श्रेय बाळासाहेबांनाच जाते. बाळासाहेबांनी भाजपसोबत युती केली. त्यामुळे भाजप खेड्यापाड्यात पोहोचला.असे राऊत म्हणाले. मला बाळासाहेबांची रोज आठवण येते. मी त्यांच्यासोबत 30 वर्षे केलं. लेखणी आणि वाणी ही त्यांची दोन शस्त्र होती. सामाना कार्यालयाची पायरी चढताना मला त्यांची रोज आठवण येते. अस म्हणत संजय राऊत भावुक झाले.
मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस 50 वर्षापूर्वी खचला होता. खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं. आज महाराष्ट्रातील मराठी माणूस आत्मविश्वासानं उभा राहतो त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना जाते. बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी अनेक घाव सोसले. आमच्या शिवसैनिकांना त्यांनी घडवलं. मराठी माणूस यापुढील अनेक शतकं त्यांचं स्मरण करेल, असही संजय राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी, नारायण राणे हे मुख्यमंत्री करुन दाखवलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’