इतका अभ्यास बरा नाही, या अभ्यासाचे ओझे झेपलं पाहिजे; राऊतांचा राज्यपालांना टोला

Sanjay Raut Koshyari
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा प्रश्न राज्यपालांच्या कोर्टात असून आपण अभ्यास करून निर्णय देतो असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलं होतं, त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपालांचा समाचार घेतला आहे. राज्यपाल अभ्यासू असून इतका अभ्यास बरा नाही असा खोचला टोला संजय राऊत यांनी लगावला

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की , आपले राज्यपाल फार अभ्यासू आहेत. इतका अभ्यास बरा नाही, या अभ्यासाचे ओझे झेपलं पाहिजे असा खोचक टोला संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोषारी यांना लगावला. घटनेमध्ये काही गोष्टी स्पष्टपणे लिहिल्या आहेत त्यानुसार तुम्हाला काम करायचं आहे असेही राऊत म्हणाले

आधीच लॉकडाऊन काळात अभ्यास कमी झाला आहे, त्यात तुम्ही प्रत्येक गोष्टीत अभ्यास करायला लागलात तर कसे चालेल असं म्हणत घटनेत असं स्पष्ट लिहिलं आहे कि मंत्रिमंडळाच्या शिफारसी तुम्हाला मान्य करायच्या आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल. राज्यपालांचा शांतता अभ्यास सुरु असल्याचे नाटक सुरु असून यामध्ये फक्त राज्यपाल हे एकमेव पात्र नसून भाजपचे नेतेही सामील आहेत असं संजय राऊत यांनी म्हंटल