बैल कितीही आडमुठा असला तरी…; राऊतांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द केल्यानंतर देशातील विरोधी पक्षांनी मोदींच्या निर्णयाचे स्वागत करतानाच त्यांच्यावर चुकीच्या धोरणामुळे टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील एक ट्विट करत केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे.

बैल कितीही आठमुठा असला तरी, शेतकरी आपलं शेत नांगरतोच. जय जवान, जय किसान’ असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. त्यासोबतच राऊत यांनी एक ट्विट करत पंतप्रधान मोदींनी मृत्युमुखी पडलेल्या 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करावी. तसंच लाल किल्ला हिंसाचारासह शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

कृषी कायदे मागे घेतल्यानं शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्याची पहाट उगवली आहे. दीड वर्षापासून शेतकरी ज्या तणावात, दबावात, दहशतीत होता ते जोखड आता निघालंय. स्वातंत्र्य काय असतं? कंगना रणौत, विक्रम गोखले सांगतात ते स्वातंत्र्य नाही. त्यांची व्याख्या वेगळी असेल. तुमच्या मनावरील जोखड जेव्हा निघून जातं ते स्वातंत्र्य असतं. शेतकऱ्याला त्याच्या आपल्या शेतीचा मालक नाही तर गुलाम बनवणारे हे कायदे होते.” असे देखील संजय राऊत म्हणाले होते.

You might also like