राजीव सातव, तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे; संजय राऊत झाले भावुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी कोरोनावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले. ते मागील काही दिवस वेंटीलेटरवर होते. काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्या निधनानंतर राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत हे खूपच भावनिक झाले .

संजय राऊत यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे.. चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे.. तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू? असे ट्विट संजय राऊत यांनी केले.

कोण होते राजीव सातव –

राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदार होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like