राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला – शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी कोरोनावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले. ते मागील काही दिवस वेंटीलेटरवर होते. काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांना वेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. राजीव सातव यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती असे ट्विट शरद पवार यांनी केले.

गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली!

राजीव सातव हे राहुल गांधी यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जायचे. सातव हे हिंगोलीचे माजी खासदार आहेत. 2014 मध्ये मोदी लाटेतही त्यांचा विजय झाला होता. काँग्रेस आणि गांधी घराण्याची निष्ठा असल्याने त्यांच्याकडे गुजरातच्या काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदार देण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like