नवी दिल्ली । प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. शेतकरी नियोजित मार्गावरून थेट दिल्लीत शिरले आहेत. या दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. आंदोलकांनी बॅरिकेटस सोडून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर काही आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करून तेथे प्रदर्शन केलं. या सर्व घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
मोदी सरकार काय याच दिवसाची वाट पाहत होती काय? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. साकारणे शेवट पर्यंत शेतकऱ्यांचे का नाही ऐकलं. कुठल्या प्रकारची लोकशाही भारतात आहे. ही लोकशाही नाही. दुसराच काही तरी चालू आहे, अशा तिखट शब्दांत संजय राऊत यांनी मोदी सरकारला घेरलं आहे.
जर सरकारची इच्छा असती तर हिंसा थांबवू शकली असती. दिल्लीत जे काय सुरु आहे त्याचे समर्थन कुणीही करणार नाही. कोणीही लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान करणार नाही. पण वातावरण कोणी बिघडवलं? असा सवाल करत राऊत यांनी मोदी सरकाराच्या कार्यशैलीवर सवाल खडा केला. सरकार किमान शेतकरी विरोधी कायदे रद्द का नाही करत? कि कोणता अदृश्य हात राजकारण करत आहेत? असा प्रश्न करत राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली.
तत्पूर्वी, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली नियोजित मार्गावरून भरकटून थेट दिल्लीच्या दिशेने गेली. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
क्या सरकार इसी दिनका बेसब्रीसे इंतजार कर रही थी?
सरकारने आखीरतक लाखो किसानों की बात नही सुनी.
ये किस टाईप का लोकतंत्र हमारे देशमे पनप रहा है?
ये लोकतंत्र नही भाई..
कुछ और ही चल रहा है.
जय हिंद— Sanjay Raut (@rautsanjay61) January 26, 2021
आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी आयटीओ येथील मंडी हाऊस जवळ रोखण्यात यश मिळालं आहे. शेतकरी राजपथाकडे जाऊ नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे. मात्र, ITO येथे पोलिसांशी झालेल्या संघर्षानंतर काही आंदोलक शेतकरी लाल किल्ल्यावर पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यात प्रवेश करून तेथे प्रदर्शन केलं. सध्या शेतकऱ्यांवर नियंत्रण मिळवण्याचा दिल्ली पोलीस आटोकाट प्रयन्त करत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या तुलनेत पोलिसांची संख्या तोकडी पडत आहे. पोलिसांसमोर आंदोलक शेतकऱ्यांना आता दिल्लीच्या बाहेर काढणे मोठं आव्हान आहे. ताज्या माहितीनुसार शेतकरी परतण्यास सुरुवात झाली आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’