‘बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचे भाजपला खुलं चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई ।  शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांची पत्नी वर्षा संजय राऊत (Varsha Raut) यांना ED ने नोटीस पाठवली आहे. यानंतर भाजप नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.  त्यावर आता संजय राऊत यांनी तितक्याच जोरदारपणे पलटवार केलाय. ”माझ्या माहितीप्रमाणे बाहेरच्या व्यक्तीला ईडी कार्यालयात प्रवेश मिळत नाही. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून भाजपचे लोक या कार्यालयात चकरा मारत आहेत. महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका. हे सरकार आम्ही कोणत्याही परिस्थितीत पाडायचं ठरवलं आहे. असं भाजप नेते म्हणत आहेत.  बायकांच्या पदराआडून लढाईची मोहीम तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा राऊत यांनी भाजपला दिलाय.

”मला उद्धव ठाकरेंनी सांगितलं की कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही. माझ्याकडे सगळ्यांचे हिशोब आहेत. तुमच्या कुटुंबाच्या व्यवहाराचाही आमच्याकडे हिशोब आहे. राजकीय सुडाला राजकीय सुडानेच उत्तर दिलं जाईल. हे प्रकरण तुम्हाला महाग पडेल, असा इशाराही राऊत यांनी दिलाय. गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात.. याला फ्रस्टेशन, हतबलता म्हणतात.. राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी.. छत्रपतींची भूमी आहे, समोरासमोर लढा” अस खुलं आव्हानच त्यांनी भाजपला दिल आहे.

आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटलं तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात. असा आरोप राऊतांनी केला.

राऊत पुढे म्हणाले, कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment