माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार; संजय राऊतांनी ED ला दिले हे ओपन चॅलेंज

0
31
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आता माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार असल्याचं सांगत संजय राऊता यांनी ED ला ओपन चॅलेंज दिले आहे. शिवसेना भवन येथे राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे. हे सर्व नेते ईडीच्या कारवाईसाठी एकदम फिट आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई करुन दाखवावी असं चॅलेंज राऊत यांनी दिले आहे. आम्ही एक सर्वसामान्य कुटुंब आहोत. माझी बायको एक सामान्य शिक्षिका आहे. तिने घर खरेदी करण्यासाठी 50 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र राजकिय षडयंत्रासाठी माझ्या पत्नीला ईडीची नोटिस बजावण्यात आली आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे.

सरकार टिकू देऊ नका म्हणुन भाजपचे काही नेते मला धमकावत आहेत. तुम्ही नोटीस पाठवा नाहितर आम्हाला घरी येऊन अटक करुन घेऊन जा. आम्ही घाबरत नाही. मात्र हे बायकांच्या पदराआडून केलेली खेळी तुमच्यावर पलटल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाना साधलाय.

भाजप नेत्यांची 1600 पटीनं संपत्ती वाढली मग त्यांची चौकशी का केली नाही असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. बायकांना अम् मुलांना लढाईत आणायचं नाही अशी आम्हाला शिकवण आहे पण जर तुम्ही हे असे करणार असाल तर तुमचेही वस्त्रहरण केल्याशिवाय राहणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here