हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार टीका करताना शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे असे म्हणल होत. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे.
जम्मू काश्मीर मध्ये भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं. मेहबुबा मुफ्तीसोबत सरकार कोणी स्थापन केलं? आम्ही तेव्हादेखील हे पाकिस्तानवादी, फुटीरवादी असल्याचं सांगत होतो. काश्मीरमधील हुतात्म्यांचा, पंडितांचा अपमान करु नका आम्ही सांगत होतो. त्यामुळे जनाबसेनावाले खरे कोण हे आम्ही महाराष्ट्रात जाऊन सांगू, असं संजय राऊतांनी म्हंटल.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला सुनावले आहे. भाजपचे हिंदुत्व हे राजकारणा साठी आहे तर शिवसेनेच हिंदुत्त्व हे देशासाठी आहे अस त्यांनी म्हंटल. तसेच एमआयएम शी युती शक्यच नसून शिवसेनेच हिंदुत्त्व महाराष्ट्रभर पोचवून एमआयएमचा डाव उधळून टाका असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.