कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो; संजय राऊतांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जर आदेश दिले तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोणाशी मैत्री करायची हे वाघ ठरवतो असे संजय राऊत यांनी म्हंटल.

नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, चंद्रकांतदादा गोड माणूस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा….त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, पण वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

राऊत म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे असतात त्यांनी राजकीय प्रचार करू नये, पश्चिम बंगालमध्ये जे झाले ते चुकीचे होते. पंतप्रधानांनी राजकीय प्रचार करता कामा नये, मग ते मनमोहन सिंग असतील किंवा नरेंद्र मोदी असतील. बाळासाहेब ठाकरेही हीच भूमिका मांडायचे. तसेच भाजपाला जे यश मिळत आहे ते मोदींच्या चेहऱ्यामुळेच मिळत आहे. मोदी हेच भाजपाचे नेते आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment