सत्ता गेल्यामुळे बाटग्यांना झटका येतोय; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

0
28
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. याचवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावत जोरदार टीका केली. सत्ता गेल्यामुळे बाटग्यांना झटका येतोय. तसेच ज्यांनी ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते शिल्लक राहिले नाहीत असेही राऊत म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शिवसेना भवन ही फक्त एक इमारत नसून मुंबई, महाराष्ट्राची रक्षणकर्ता असलेली वास्तू आहे. जे स्थान हुतात्मा स्मारकाला आहे, त्याच भावना लोक शिवसेना भवनाविषयी व्यक्त करतात. ती वास्तू बाळासाहेब ठाकरेंची आहे. शिवसेना भवन हे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतिक आहे. ते तोडण्याफोडण्याची भाषा नतद्रष्टच करू शकतात. बाटगेच करू शकतात एवढंच मी सांगेल, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सत्ता गेल्यामुळे बाटग्यांना झटका येतोय. सत्ता भोगायला मिळेल म्हणून ते भाजपमध्ये गेले पण सत्ता न आल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून काही लोकं असे उद्योग करत आहेत पण ज्यांनी ज्यांनी शिवसेना भवनावर हल्ला करण्याची भाषा केली. त्या पैकी कोणीही राजकारणात शिल्लक राहिलं नाही. सार्वजनिक जीवनात राहिलं नाही, हे लक्षात ठेवा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here