माझ्या कानावर आलंय, चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार; राऊतांचा टोला

0
41
sanjay raut chandrakant patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणे येथील एका कार्यक्रमात मला माजी मंत्री म्हणू नका, येत्या 3-4 दिवसांत कळेल अस विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत चंद्रकांत पाटलांचा समाचार घेतला. चंद्रकांत पाटील नागालँडचे राज्यपाल होणार अस माझ्या कानावर आलंय म्हणून ते तस बोलले असतील असा टोला संजय राऊतांनी लगावला.

संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत दादा हे आमचे मित्रं आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका करत असतो. ते म्हणाले माजी मंत्री म्हणू नका. चमत्कार होणार आहे. चंद्रकांतदादा अवतारी पुरुष आहे. चमत्कारी पुरुष आहेत. ते काही तरी चमत्कार घडवतील. पण माजी मंत्री म्हणण्याची त्यांची वेदना समजू शकतो, असंही राऊत म्हणालेत.

उद्धवजींच्या नेतृत्वात सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी मनाची तयारी करावी. स्वप्न बघण्यावर कोणताही टॅक्स लागेला नाही. जीएसटी लागलेला नाही. ते नागालँडचे राज्यपाल होणार आहेत. त्यांना ऑफर आली असं माझ्या कानावर आलं. त्यामुळे त्यांना माजी म्हणून घ्यायचं नसेल, असं राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here