हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत अस वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केल्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत भिंडेचा समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या मुळावर असे आंडू-पांडू खूप येऊन गेले. महाराष्ट्राने अशा आंडू-पांडूंना धडा शिकवलाय, अशा शब्दात राऊत यांनी संभीज भिडेंवर टीका केली. आतासुद्धा शिवसेना म्हणून, महाराष्ट्र म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं. तर, पळता भूई थोडी होईल.
यावेळी त्यांनी केंद्र सरकार वर देखील निशाणा साधला. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणातात, लस उत्सव साजरा करा. जागृती होण्यासाठी आणि महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे, का? तर इथे भाजपाचं राज्य नाही. इथे शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. याला अमानुष राजकारण म्हणतात. महाराष्ट्रापेक्षा लोकसंख्या कमी असूनही गुजरातला १ कोटी लसी देण्यात आल्या आहेत आणि महाराष्ट्राला आठवड्याला ४० लाख लसींची आवश्यकता असताना, आठ लाख लसींचाही पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली जात आहेत.”
काय म्हणले होते संभाजी भिडे
करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी करोना निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे”. असे वक्तव्य केले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page