हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; विनायक राऊतांचे खुलं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सी वर्ल्ड आणि नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही प्रकल्प आधी निश्चित झालेल्या जागेवरच होणार, त्यात कुठलाही बदल होणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठणकावलं आहे. मात्र हिंमत असेल तर नारायण राणेंनी नाणार रिफायनरी प्रकल्प रेटूनच दाखवाव असं खुल आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे.

नाणार रिफायनरी होऊ नये म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी राणेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजप सरकारवर वाट्टेल ती टीका केली होती. आता सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना रिफायनरीचा कळवळा आलाय. पण हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरीचा प्रस्ताव नारायण राणेंनी रेटून दाखवावा,’ असं आव्हान राऊत यांनी दिलं

नारायण राणेंचा जीव सी वर्ल्डमध्ये  गुंतलेला आहे. 300 एकर मध्ये सी वर्ल्ड करायचा आणि 1400 एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेल उभी करायची, हा धंदा नारायण राणे यांचा होता. त्यापासून ते दूर गेलेले नाहीत. हा त्यांचा प्रयत्न चालूच राहणार आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.