मोदींनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला ?? सामनातून पुन्हा एकदा मोदींना केलं लक्ष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेला संबोधित केलं. मोदी नक्की काय बोलणार यांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी त्यांनी देशातील कोरोनाचं संकट अद्याप गेलं नसून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्यांच्या 10 मिनिटांच्या भाषणात त्यांनी फक्त कोरोनावरच भाष्य केलं. मोदींच्या भाषणावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातुन उपरोधिक टीका करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या या भाषणानं देशवासियांना काय मिळालं, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना त्यांनी काय दिलासा दिला असे अनेक प्रश्न उपस्थित करत ‘सामना’ अग्रलेखातून भाजपला सणसणीत टोला लगावण्यात आला आहे.

काय लिहिलं आहे सामना अग्रलेखात

मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. त्यांची दाढी अधिक शुभ्र आणि छातीपर्यंत वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरही वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या मार्गाने निघाले आहेत किंवा त्यांनी एखाद्या दीर्घ तपस्येची पूर्वतयारी सुरु केलेली दिसते”, असा टोला अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात देशवासीयांना काय दिले? त्यांच्या भाषणात नवीन काय? त्यांनी महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांना काय दिलासा दिला? कोणते आर्थिक पॅकेज जाहीर केले? असा टीकेचा सूर निघू शकेल. तरीही मोदींचे भाषण छोटेखानी, पण प्रभावी होते”, अशी उपरोधिक टीका ‘सामना’ अग्रलेखात करण्यात आली आहे. मोदी यांची स्वतःची एक कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीवर कितीही टीका झाली तरी ते त्यांची पद्धत बदलत नाहीत, हे त्यांच्या मंगळवारच्या राष्ट्रीय संबोधनाने स्पष्ट झाले”, असंदेखील अग्रलेखात म्हटले आहे.

“मोदींनी देशातील कोरोनाचा धोका कायम असल्याचे सांगितले. लोकांनी अजिबात निष्काळजीपणा नये, असा इशाराच वडिलकीच्या नात्याने दिला. मोदी यांनी फक्त सात-आठ मिनिटांचे कोरोनासंदर्भात जे प्रबोधन केले ते गेल्या सात-आठ महिन्यांतील उत्तम संबोधन होते”, अस  अग्रलेखातून म्हटलं आहे.

राज्यपालांना टोला-
“पंतप्रधान मोदी यांनी नवरात्र, दसरा, ईद, दीपावली, छटपूजा आणि गुरुनानक पर्व आदी सर्वधर्मीय सणांसाठी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. याचा स्पष्ट संदेश असाच आहे की, आपले पंतप्रधान घटनेनुसार ‘सेक्युलर’च आहेत आणि याची नोंद आपल्या राज्यपालांनी घेणे गरजेचे आहे”, असा टोलादेखील अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment