हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याच्या वंशजांसदर्भात केलेले वक्तव्य हे त्यांच्या समर्थकांना आणि महाराष्ट्राला पटणारे नाही. ज्या संभाजी भिडेंनी जेव्हा माझ्याकडून अशाप्रकारचं विधान झालं होतं तेव्हा आंदोलनाची हाक दिली होती ते आता प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात आंदोलन करणार का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, यापूर्वी मी छत्रपती घराण्यासंदर्भात विधानं केलं होतं तेव्हा संभाजी भिडे यांनी आंदोलन पुकारलं होतं. त्यामुळे आताही ते सातारा, सांगली आणि कोल्हापूर बंद करणार का, हे मी त्यांना विचारेन. म्हणजे आम्हालाही भूमिका घेता येईल, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला. त्यामुळे आता संभाजी भिडे या टीकेला प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नक्की काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांनी घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकरांनी टीका केली होती.‘एक राजा तर बिनडोक आहे. तर दुसरे संभाजीराजे आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’