हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मी राहुल गांधी यांचा समर्थक असून काँग्रेसला राहुल गांधींशिवाय पर्याय नाही अस विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच राहुल गांधींच्या नेतृत्वाला तडे जावे, त्यांच नेतृत्व उभं राहू नये. यासाठी भाजपकडून अनेक प्रयत्न सुरु आहेत. हे सत्य असेल, तरी राहुल गांधी उभे आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल आहे. संजय राऊत यांना नुकतंच लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर संजय राऊतांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली आहे.
मी राहुल गांधींचा समर्थक आहे. सर्वांना पंडित नेहरु, पंतप्रधान मोदी, शरद पवार होता येणार नाही. प्रत्येकांच्या मर्यादा असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे जे काही सांगणं असतं ते मार्गदर्शक म्हणून स्वीकारायला हवं. ते जे काही सांगतात. तेव्हा त्यांचा अभ्यास असतो. आम्हीही पवारांचं मार्गदर्शन घेतो. प्रत्येकाने अहंकार आणि इगो विसरुन ते जे काही सांगतात. त्यांचं ऐकायला हवं, असे संजय राऊतांनी सांगितले आहे.
आम्ही देशातील शेतकऱ्यांसोबत आहोत. अकाली दलाचे प्रमुख नेते मुंबईत येऊन ते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटतील. यानंतर पुढील रणनिती ठरवली जाईल, असेही संजय राऊतांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या व्होट बँकेत अनेक वाटेकरी निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसची जागा ही राष्ट्रवादीने घेतली आहे. ते मूळचे काँग्रेसचे आहेत. प्रादेशिक अस्मिता वाढल्याने काँग्रेसचे महत्त्व कमी झालं आहे, असेही संजय राऊतांनी यावेळी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’