हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट झाली होती. संजय राऊत यांचा राहुल गांधींसोबतचा फोटो जोरदार चर्चेत आला होता. तेव्हा संजय राऊत राहुल गांधी यांना काहीतरी सांगत असल्याचे दिसत होत.
आता संजय राऊत यांनी या भेटीत नेमकं काय झालं हे सांगितले आहे. मला एका वाक्यात शिवसेना काय आहे, असं राहुल गांधी यांनी विचारलं. त्याला उत्तर म्हणून आम्ही असे आहोत की एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. ‘फटे लेकीन हटे नही’ असं आमचं असतं. आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही,” असं राऊत म्हणाले. तसंच शिवसेना असंख्य वार आणि घाव घेऊन इथपर्यंत आली आहे. असे संजय राऊत म्हणाले.
शिवसेनेचा प्रचार देशभर व्हावा हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री देशात पहिल्या पाचात आहेत. पण शिवसेनेला राज्यात क्रमांक एकचा पक्ष करणं हेच आमचं ध्येय आहे. विधानसभेच्या १५० जागा जिंकून कोणाच्याही कुबड्यांशिवाय सरकार स्थापन करायचं आहे असे संजय राऊत यांनी म्हंटल.