हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमधील मुंगेर येथे झालेल्या हिंसाचावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. यापूर्वी सामना संपादकीयमधूनही मुंगेर हिंसाचारावर भाष्य करत कधी घंटा बडवणार? निदान थाळय़ा तरी वाजवा असा उपहासात्मक सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना याप्रकरणी विनंती करणार असल्याचा टोला लगावला.
आतापर्यंत बिहार राज्यपालांनी आणि भाजपनेही यासंबंधी कोणतेही प्रश्न उपस्थित केले नाहीत. मी तर महाराष्ट्राच्या राज्यपालांना तेथील राज्यपालांशी चर्चा करा अशी विनंती करणार आहे. तेथील सरकारचे प्रमुख धर्मनिरपेक्ष झाले का असं विचारा? असं सांगणार आहे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण??
एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत असतानाच बिहारमधील मुंगेरमध्ये सध्या चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरलं आहे. मुंगेरमधील परिस्थितीची चक्क केंद्रीय निवडणूक आयोगाला दखल घ्यावी लागली. मुंगेरमध्ये सलग दुसऱ्यांदा हिंसेचा भडका उडाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुंगेरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
मुंगेरमध्ये गुरूवारी पुन्हा एकदा हिंसाचारानं टोक गाठलं. याचं मूळ कारण आहे दूर्गा मूर्ती विसर्जनावेळी झालेला वाद. राज्यात निवडणूका असल्यानं जिल्हा प्रशासनानं दुर्गा मूर्ती विसर्जनासाठी २६ ऑक्टोबरपर्यंतचं वेळ दिली होती. मुंगेरमधील पंडित दीन दयाल चौकाजवळील शंकरपूरमध्ये याच काळात पोलीस आणि स्थानिकांमध्ये वाद झाला. याच वादातून मध्यरात्री गोळीबार करण्यात झाला. यात एका १८ वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. तर इतर काही लोक जखमी झाले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’