फ्रान्समधील धर्माच्या नावावर गळे चिरणारे मानवतेचे शत्रू ; मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे – शिवसेना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्समधील एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या ‘कट्टरवादी इस्लाम’बाबतच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देश नाराज झाले आहेत. जगभरात अनेक ठिकाणी मुस्लीम सामुदाय मॅक्रॉन यांचा विरोध करत आहेत. अशात शिवसेना मात्र मॅक्रॉन यांच्या पाठीशी उभी राहिली आहे.तसेच मॅक्रोन यांच्या पाठीशी उभे रहा अस आवाहनही केलं आहे.

मोहम्मद पैगंबर यांचे कोणतेही चित्र अस्तित्वात नाही. ही श्रद्धा आहे. त्यामुळे असे चित्र काढणे हा मुसलमानांनी गुन्हा ठरवला, पण त्या गुन्ह्यासाठी ‘अल्ला हो अकबर’चे नारे देत लोकांना गळे चिरून मारा, असेही पवित्र कुराणात लिहिलेले नाही किंवा पैगंबर साहेबांनी सांगितलेले नाही. त्यामुळेच फ्रान्समध्ये ज्यांनी धर्माच्या नावावर गळे चिरण्याचा अमानुष, अघोरी प्रकार केला ते मानवतेचे, जगाचेच शत्रू आहेत. मॅक्रॉन यांच्या पाठीशी त्यासाठीच उभे राहणे गरजेचे आहे. हिंदुस्थानातील राजकीय पक्षांनी व मुस्लिम समुदायाने फ्रान्सच्या अंतर्गत भानगडीत पडण्याचे कारण नाही, अस सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात

फ्रान्समध्ये जे घडले त्याचा संबंध पुन्हा एकदा पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्राशी आहे. प्रेषित मोहम्मदांचे व्यंगचित्र काढल्यामुळे मुस्लिमांच्या भावना भडकल्या. त्या इतक्या की, धर्मांध मुसलमानांनी लोकांचे गळे चिरून हत्या केल्या आहेत व कॅनडापासून फ्रान्सपर्यंत निरपराध लोकांवर चाकूहल्ले सुरू झाले आहेत. मुंबई-ठाण्यातील मुस्लिमांनीही फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या विरोधात निदर्शने केली. भाजपचे राज्य असलेल्या भोपाळमध्ये मॅक्रॉनविरोधात हजारो मुसलमान जमले व त्यांनी घोषणाबाजी केली.

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी दहशतवादाविरुद्ध युद्ध पुकारले आहे व पंतप्रधान मोदी यांनी युद्धात प्रे. मॅक्रॉन यांना पाठिंबा जाहीर केला आहे हे योग्यच झाले. दहशतवादाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येकास समर्थन देणे आपले कर्तव्यच आहे. दहशतवादाच्या भयंकर अंधारातून आपण आजही प्रवास करीत आहोत. धार्मिक उन्माद व त्यातून निर्माण झालेल्या दहशतवादाने हिंदुस्थानला मोठी किंमत चुकवावी लागली. कश्मीरात आजही हिंसाचार सुरूच आहे व तो हिंसाचार धर्माच्या नावाखाली आहे.

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची भूमिका स्पष्टच आहे. ते म्हणतात, ‘‘मी मुस्लिमांचा एक व्यक्ती, एक समाज म्हणून सन्मानच करतो. पैगंबर मोहम्मद यांचे व्यंगचित्र काढल्याने मुस्लिमांचे व्यथित होणे मी समजू शकतो. पण त्यावर प्रतिक्रिया म्हणून लोकांचे गळे चिरणे सहन केले जाणार नाही.’’ मॅक्रॉन यांची भूमिका योग्यच व मानवतेच्या हिताची आहे. पैगंबर मोहम्मदांचं व्यंगचित्र वर्गात दाखवल्याने विद्यार्थ्याने शिक्षकाचा गळा चिरला. नंतर निस शहरांत चर्चबाहेर गळा चिरून तिघांना मारले. शनिवारी एका फादरवर गोळ्या झाडून त्यांना ठार केले. हे लोण आता पसरत चालले आहे.

पैगंबर हे शांततेचे, सद्भावनेचे, संयमाचे प्रतीक आहेत. त्या विचारांचा खून त्यांचे अुनयायी म्हणवणारे करीत आहेत व संपूर्ण इस्लामपुढे त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. फ्रान्समधील घटनेची दखल मुस्लिम राष्ट्रांनी घेतली व तेथे मॅक्रॉनविरोधात फतवे वगैरे जारी केले, पण सर्वप्रथम या ‘फतवे’ बहाद्दरांनी दहशतवादी कृत्याचा धिक्कार करायला हवा. गळे चिरून मारणे अशी आज्ञा ना कुराणात आहे ना प्रेषित पैगंबर साहेबांनी दिली आहे. असेही सामनातून म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment