देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणे सोडावं; शिवसेनेचा फडणवीसांवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना कहर मोठ्या प्रमाणात होत असून सरकार लॉकडाउनच्या विचारात असतानाच विरोधी पक्ष भाजप कढून लॉकडाउनला पूर्णपणे विरोध आहे. यावरूनच शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपला खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे.

राज्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, असे सरसकट सगळय़ांचेच म्हणणे आहे व ते योग्यच आहे. महाराष्ट्रात सध्या रोज पंचवीस हजारांवर कोरोना रुग्ण वाढत आहेत. मुंबईत पाच-सहा हजार रोजचा आकडा आहे. इस्पितळे भरली आहेत व रुग्णांसाठी खाटा नाहीत. हे चित्र तरी राज्याला परवडणारे आहे काय? राज्यात कोरोनाच्या संक्रमणास लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉक डाऊनचे संकेत दिले आहेत. त्या लॉक डाऊनवरून तीव्र मतभेद समोर आले आहेत

महाराष्ट्रात लॉक डाऊन कराल तर याद राखा. रस्त्यांवर उतरू,’ असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. लॉक डाऊन नकोच असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल सांगत आहेत. लॉक डाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडणार आहे. त्याची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावी, असे काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. रुग्णवाढ रोखण्यासाठी लॉक डाऊन गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सांगत आहेत. प्रत्येकाचे म्हणणे आपापल्या पातळीवर योग्यच आहे. अस सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

राज्यात सर्वाधिक मृत्यू हे नागपुरात होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात कोरोनामुळे 54 रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचे सोडून द्यायला हवे. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवायला पाहिजेत, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like