हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या डीपीला तिरंगा ठेवला आहे तर दुसरीकडे जेकेपीडीपीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी मात्र आपल्या ट्विटर अकाऊन्ट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुफ्ती मोहम्मद सईद यांचा फोटो शेअर केलाय. यामध्ये तिरंग्यासह काश्मीरचा झेंडाही लावण्यात आलाय. याच्यावरून शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपवर टीका करताना शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.
फुटीरतावादाचे विष आजही पेरणाऱ्या आणि आपल्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर ‘कश्मीरचा ध्वज फडकविणाऱ्या मेहबुबांना हात लावण्याची हिंमत केंद्रातील सरकारमध्ये नाही. हिमतीचेच म्हणायचे तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पाकने गिळलेल्या आमच्या कश्मीरमध्ये पाऊल ठेवायला हवे होते. सोबत महाराष्ट्रातील नवमर्द शिंदे, केसरकर, सामंत, भुसे यांना न्यायला हवे होते. भाजपच्या नादास लागून शिवसेनेत फूट पाडल्यापासून या ‘नवमर्द’ गटासही हिंदुत्वाची मोठीच सुरसुरी आली आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात या सुरसुरी फुटीर गटासह पाकव्याप्त कश्मीरात पाऊल ठेवून देशासमोर आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे असा टोला सामनातून लगावला आहे.
मेहबुबा मुफ्ती यांनी सरळ भारतीय सार्वभौमत्वालाच आव्हान दिले. श्रीमती मुफ्तींकडून त्यांच्या ‘ट्विटर’ अकाऊंटवर कश्मीरचा ध्वज फडकवला. तिरंग्याच्या बाजूला कश्मीरचा ध्वज, असे हे चित्र आहे. मोदींच्या राज्यात एक महिला पुढारी फुटीरतेचा ध्वज फडकवूनही मोदी-शहा गप्प कसे? असा सवाल करत कायद्याचे बडगे फक्त तुमच्या राजकीय विरोधकांची नरडी बंद करण्यासाठीच आहेत. हे एकदा स्पष्ट सांगा असे शिवसेनेने म्हंटल