नवी दिल्ली | ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिक आणीबाणी लागू करावी’ असे म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. ‘केंद्रीय गृहमंत्रालयाने देशाच्या सुरक्षेचा मुद्दा समोर करत कोणत्याही व्यक्तीचा मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचे अधिकार काही तपास यंत्रणांना दिले आहेत’ या पार्श्वभुमिवर कायंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
जनतेच्या गोपनियतेवर कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्र सरकार पाळत ठेवत असल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदींनी केवळ औपचारिकरित्या देशात आणीबाणीच घोषित करावी, अशा शब्दांत कायंदे यांनी केंद्र सरकावर टीका केली.
देशातील जनतेवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा सूर अनेक राजकीय पक्षांनी आवळला आहे. सरकारच्या या धोरणाचा विरोध देशभरात केला जात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापाठोपाठ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनेही केंद्रातील मोदी टीकास्त्र सोडले आहे.
ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.