हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सलग 4 वेळा बेळगावचे खासदार राहिलेले सुरेश अंगडी यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके याना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबद्दल माहिती दिली.
संजय राऊत यांनी याबाबत ट्विट करत म्हणाले की बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार दर्शन शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे शिवसेनेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी 14 तारखेला बेळगावला पोहोचत आहे.. जय महाराष्ट्र
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समीतीचे उमेदवार दर्शन शेळके यांनी जोरदार मुसंडी मारली आहे शिवसेचा त्यांना पाठिंबा आहे. मी स्वतः त्यांच्या प्रचारासाठी 14 तारखेला बेळगावला पोहोचत आहे..
जय महाराष्ट्र pic.twitter.com/OvuBrq3DK5— Sanjay Raut (@rautsanjay61) April 12, 2021
दरम्यान 17 एप्रिल ला बेळगाव लोकसभेची पोटनिवडणुक होणार असून भाजपने सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी याना उमेदवारी दिली असून काँग्रेस कडून सतीश जारकीहोळी रिंगणात उतरले आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडुन शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे काटे की टक्कर पाहायला मिळेल.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page