राष्ट्रवादीच्या फुटलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी सेनेने लावला जोर! ‘सर्च ऑपरेशन’ सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसकडून फुटलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी आता खुद्द शिवसेनेनं पुढाकार घेतलेला आहे. त्याचंच भाग म्हणून राष्ट्रवादीचे उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना नाट्यमयरित्या वाय.बी चव्हाण सेंटर येथे आणण्यात शिवसेनेला यश मिळालं आहे. बनसोडे यांना आणतांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर यांनी भूमिका बजावली. आपल्या गाडीत बनसोडे बसवून आणत त्यांना आमदारांच्या बैठक सुरु असलेल्या ठिकाणी आणले गेलं. मिळालेल्या माहितीनुसार बनसोडे हे मुंबई विमानतळा जवळील सहार हॉटेलमध्ये नजरकैदेत होते. सध्या फुटलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचे एकत्र प्रयन्त करत आहेत असं चित्र पाहायला मिळत आहेत. आता शिवसेनेच्या प्रयत्नांना यश मिळतांना दिसत आहे.

वाय.बी चव्हाण सेंटर येथे पोहचल्यावर ‘मी कुठेही गेलेलो नव्हतो, मी राष्ट्रवादीसोबतच आहे’ असे सांगितलं. सध्या वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये ४० आमदारांसोबत शरद पवार यांची बैठक सुरु आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या ९ आमदारांचे दिल्लीचे तिकीट बुकिंगची एक लिस्ट व्हायरल होत आहे. तेव्हा या आमदारांना इतरत्र हलवण्याचे प्रयन्त केले जात असल्याचे संकेत या मिळत आहेत.

WhatsApp Image 2019-11-23 at 6.27.35 PM.jpeg

 

Leave a Comment