शॅडोचे पण माझे कुटुंब-माझी जबाबदारी ; शिवसेनेकडून प्रथमच राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेतुन बंड पुकारत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे हा नवीन पक्ष स्थापन केला. ठाकरे कुटुंबात राजकीय मतभेद झाले असले, तरी दोन्ही कुटुंबांनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करणं टाळलं होतं. राजकारण बाजूला ठेवत दोन्ही ठाकरे बंधू आणि कुटुंब सुख-दु:खाच्या प्रसंगात एकत्र येतात.पण आज शिवसेनेने मनसेवर आणि खास करून राज ठाकरे यांच्या कुटुंबावर थेट जहरी टीका केली आहे.

मनसेची आज मुंबईमध्ये बैठक होत आहे. या बैठकीला राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि सून मिताली ठाकरे (Mitali Thackeray) उपस्थित आहेत. यावर ‘शॅडोचे पण माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, असं खोचक ट्विट शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी केलं आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुका आणि पक्ष वाढीसाठी नवनवीन संकल्पना यावर चर्चा होणार आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे यासारखे विविध नेते उपस्थित आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment