मुंबई प्रतिनिधी । लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला शिवसेनेनं पाठिंबा दिल्यानंतर राज्यात सत्तेत सहभागी काँग्रेसने काहीसा नाराजीचा सूर लगावला आहे. यागोष्टीला नमूद करताना राज्याचे कॅबिनेट मंत्री काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला मोलाचा सल्ला देणारी प्रतिक्रिया माध्यमांत दिली आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले कि,”शिवसेनेने राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या बाजुने मतदान करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या देशात संविधानाच्या आधारावर शासन चालते आणि समानता हा त्याचा पाया आहे. तेव्हा विचार करून शिवसेनेने निर्णय घ्यावा ” असं मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं.
याआधी काँग्रेसचे जेष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी लोकसभेत शिवसेनेच्या विधेयकाच्या बाजूने केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देशहिताचे कारण समोर करत सारवा-सारव केली होती. दरम्यान काँग्रेसच्या नाराजीचा सूर तीव्र होत असल्याचे जाणवल्यानंतर केंद्र सरकारने आमच्या काही सूचना आणि शंका दूर केल्याशिवाय आम्ही राज्यसभेत विधयेकाला मतदान करणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे.
Maharashtra Cabinet minister & Congress leader Balasaheb Thorat: Our country is governed by the Constitution and the Constitution is based on the principle of equality. We expect that Shiv Sena will keep this in mind while voting for #CitizenshipAmendmentBill2019 in Rajya Sabha pic.twitter.com/f1dtfs9Dpt
— ANI (@ANI) December 11, 2019