औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून संप पुकारला आहे. प्रशासनाने संपावरील कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले, तर काही अजूनही कामावर हजर झाले नाहीत. जे हजर झाले त्यांच्या मदतीने व खाजगी शिवशाहीच्या वतीने प्रवासी वाहतूक सध्या सुरू आहे.
काल दिवसभरात पुणे मार्गावर 14 खाजगी शिवशाही चालवण्यात आल्या. या खाजगी शिवशाहींनी दिवसभरात 2 लाख 8 हजार 80 रुपयाचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत पाडून दिले.
याव्यतिरिक्त मध्यवर्ती बस स्थानकातून औरंगाबाद-बुलढाणा मार्गावर 3, औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर 5, औरंगाबाद-वैजापूर मार्गावर 1, औरंगाबाद-कन्नड मार्गावर 2, तर औरंगाबाद-पुणे मार्गावर 1 लालपरी चालवण्यात आली. तसेच औरंगाबाद-तुळजापूर 2, औरंगाबाद-नगर 1, औरंगाबाद-नाशिक 1, आणि औरंगाबाद-जळगाव मार्गावर 2 लालपरी चालवण्यात आल्या. नाशिक मार्गावर 6 खाजगी शिवशाही बस चालवण्यात आल्या.