व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता हरपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे असे शरद पवार यांनी म्हंटल.

याबाबत शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले

शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे शरद पवार यांनी म्हंटल.