हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी एका कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्याला शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतंच आम्हाला शिवचरित्र माहिती आहे. आज आपल्याला शिवाजी महाराज फार थोडे कळाले आहेत, असे मत व्यक्त केले.
पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना शंभरावे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदीसह विविध मान्यवरांनी शुभेछया दिल्या. तत्पूर्वी शिवशाहीर पुरंदरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आज आपल्याला शिवाजी महाराज फार थोडे कळतात. आम्हाला फक्त चित्र कळले आहे, चारित्र्य कळालेले नाही. शाहिस्तेखान, पावनखिंड, गड आला पण सिंह गेला एवढ्यापुरतंच आम्हाला शिवचरित्र माहिती आहे. पण त्यांनी ज्या लोकांच्या नित्य उपयोगाच्या गोष्टी केल्या आहेत त्या माहिती आहेत का?. त्या माहिती पाहिजेत,” असे पुरंदरे यांनी म्हटले आहे.
पुरंदरे पुढे म्हणाले की, “ज्याला हौस नाही त्याने लग्न करु नये अशी आपल्याकडे म्हण आहे. या म्हणीप्रमानेच माणूस हौशी पाहिजे, त्याच्यामध्ये सतत काहीतरी नवीन नवीन करण्याची हौस असली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना ती हौस होती, त्यामुळे त्यांनी गडकिल्ले बांधले. आता ती हौस जागी करण्याचे काम आपल्या अभ्यासकांनी करायला हवे, असेही यावेळी पुरंदरे यांनी सांगितले.