कोल्हापुरात शिवभोजन योजनेला सुरुवात; मंत्री सतेज पाटीलांनी शिवथाळीचा घेतला आस्वाद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील

राज्य सरकारच्यावतीने दहा रुपयात शिवभोजन हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात कोल्हापुरात देखील झाली आहे. कोल्हापूर शहरात चार ठिकाणी हा उपक्रम आजपासून सुरू झाला आहे. गोर गरीब आणि गरजू नागरिकांना दहा रुपयात शिव थाळी देण्यात आलेली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं .

सावित्रीबाई फुले हॉस्पिटल रोडवर रुद्राक्षी स्वयम् महिला बचत गटाला शिवथाळीचे कंत्राट देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिवथाळीचा आस्वाद घेतला . या उपक्रमाचे कौतुक पालकमंत्री सतेज पाटील यांनी केलं असून खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेला शिवथाळी उपक्रमाचा फायदा होईल असं म्हटलं.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा

हे पण वाचा-

एअर इंडियाची विक्री करणे देशविरोधी; भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी जाणार न्यायालयात

मला हिंदुहृदयसम्राट म्हणू नका, तो मान बाळासाहेबांचा – राज ठाकरे

.. तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू- अशोक चव्हाण

 

Leave a Comment