‘गांगुलीच्या बरगडीत जाणूनबुजून बॉल मारला’, शोएब अख्तरचा 23 वर्षानंतर मोठा खुलासा

Sourav Ganguly and Shoaib Akhtar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी हि एक मेजवानीच असते. हे दोन देश एकमेकांसमोर आल्यावर साऱ्या जगाची नजर सामन्यावर असते. दोन्ही देशाचे संघ दमदार असल्यामुळे लढत नेहमीच चुरशीची होते. यावेळी खेळाडू जिंकण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कधी कधी खेळाडू एकमेकांना दुखापतग्रस्तही करतात. अशाच एका सामन्याबद्दल पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एक धक्कादायक खुलासा केला आहे.

23 वर्षांपूर्वी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत त्याने (Shoaib Akhtar) केलेल्या खुलाशाने सर्वजण चकीत झाले आहेत. त्या सामन्यात सौरव गांगुलीसह इतर भारतीय खेळाडूंना जाणूनबुजून जखमी करण्याची रणनीती पाकिस्तानच्या संघाकडून आखण्यात आली होती. असा खुलासा शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केला आहे. 1999 मध्ये मोहाली येथे भारत-पाक सामना झाला होता. त्या सामन्याबाबत शोएब अख्तरने भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागशी संवाद साधला. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात दोघे बोलत होते.

यावेळी शोएब अख्तर (Shoaib Akhtar) म्हणाला कि, ‘त्या सामन्यात मी सतत फलंदाजाच्या डोक्याला आणि बरगड्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत होतो. सौरव गांगुलीच्या बरगडीवर चेंडू मारण्याची रणनीती आम्ही आखली होती. विशेष म्हणजे ही रणनीती एका दिवसापूर्वी संपूर्ण टीमने बनवली होती.’ तसेच संघाच्या बैठकीत मला भारतीय फलंदाजांना जखमी करण्यास सांगितले होते. मी विचारले की फलंदाजांना बाद करायचे नाही का? त्यावर इतर गोलंदाज म्हणाले, तुझ्याकडे वेग आहे, तू त्यांना जखमी कर. त्यांना बाद करण्याचे काम आम्ही करू.’ असा खुलासा शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केला आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!