व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबईवर पुन्हा 26/11 हल्ल्याचे सावट? धमकीच्या मेसेजने खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या वेदना अजूनही मनात कायम असतानाच आता पुन्हा एकदा मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे. तशा प्रकारच्या धमकीचा मेसेज पोलिसांना आला आहे. पाकिस्तानमधील नंबर वरून हा धमकीवजा मेसेज आला आहे.

मुंबई पोलिस ट्राफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईत पुन्हा एकदा 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होईल. या हल्ल्यामध्ये भारतातलेच 6  लोक मदत करणार आहेत, असंही सदर मेसेज मध्ये म्हंटल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी असे सण तोंडावर असतानाच त्यातच या हल्ल्याच्या धमकीने सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहावं लागेल.

दरम्यान, 2 दिवसांपूर्वीच रायगड येथील हरिहारीश्वर समुद्र किनारी संशयास्पद बोट सापडली होती. या बोटीतून AK- 47 रायफल, तसेच तलवारी सापडल्याने खळबळ उडाली होती. मात्र ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची असून मस्कत हुन युरोपकडे जाताना भरकटत ही बोट हरिहरेश्वर किनाऱ्यावर आली अशी माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.