Shoaib Malik Marriage । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि टेनिस स्टार सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकने (Shoaib Malik) दुसरं लग्न केलं आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत (Sana Javed) लग्नगाठबांधली आहे. शोएब आणि आणि सानिया यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहेत. त्यातच सानियाने २-३ दिवसांपूर्वी एक सूचक पोस्ट शेअर केली होती. आता शोएबने दुसरं लग्न केल्यानंतर सोनियाची प्रतिक्रिया काय येते हे आता पाहायला हवं.
शोएब मलिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर सना सोबतच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या फार पूर्वीपासूनच येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 28 वर्षीय सना जावेदचेही हे दुसरं लग्न आहे. सनाने 2020 मध्ये उमेर जसवालशी लग्न केले होते परंतु दोघांमध्ये सार काही आलबेल नसल्याचे लगेचच उघड झालं होत. नंतर दोघांनीही सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी आली.
दरम्यान, इकडे सानिया मिर्झानेही काही दिवसांपूर्वी एक सूचक पोस्ट शेअर केली होती ज्यामुळे शोएब सोबतच्या तिच्या घटस्फोटाच्या चर्चाना बळ मिळालं होते. तिने आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं होते, ‘लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. लठ्ठपणा कठीण आहे. तंदुरुस्त राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. कर्जात अडकणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. संवाद अवघड आहे. संवाद न करणे कठीण आहे. तुमचे सर्वात कठीण निवडा. जीवन कधीही सोपे होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल. पण आपण आपली मेहनत निवडू शकतो असं तिने म्हंटल होते.