अर्थसंकल्पात वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांमध्ये नक्की कशाचा समावेश होतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भाषण करतात. हे भाषण दोन भागांमध्ये विभागलेले असते. एका भागामध्ये अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, शासनाचा दृष्टिकोन, अर्थसंकल्पातील रचना कौशल्य यांचा थोडक्यात आढावा घेण्यात आलेला असतो. तर दुसऱ्या भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या कायद्यातील बदलांचे प्रस्ताव असतात.

हे भाषण म्हणजे अर्थसंकल्प असं वाटत असलं तरी मुळात अर्थसंकल्प वेगळा आहे. खाली उल्लेख केलेला १२ कागदपत्रांचा संच म्हणजे अर्थसंकल्प होय.

१. वार्षिक वित्तीय विवरणपत्र (Annual Financial Statement)

२. महसुली अर्थसंकल्प (Revenue Budget)

३. भांडवली अर्थसंकल्प (Capital Budget)

४. दृष्टीक्षेपात अर्थसंकल्प (Budget at a Glance)

५. खर्चाचा अर्थसंकल्प (Expenditure Budget)

६. जमेचा अर्थसंकल्प (Receipts Budget)

७. अनुदानासाठी मागण्या (Demand for Grants)

८. राज्यांना वर्ग केलेली साधनसंपत्ती (Resources transfered to states)

९. योजना व्यय (Plan Expenditure)

१०. संपदनात्मक अर्थसंकल्प (Performance Budget)

११. वित्त विधेयक (Finance Bill)

१२. विनियोग विधेयक (Allocation Bill)

सदर १२ कागदपत्रांचा संच एकत्रितपणे बजेट म्हणून सादर करण्यात येतो.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

अर्थसंकल्प दरवर्षी का सादर करतात?

भगवा झेंडा खाली ठेवला नाही, आमचं अंतरंगही भगवंच ; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं भाजपाला प्रतिउत्तर

महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

Leave a Comment