कराड | कराड दक्षिण मधील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या उंडाळे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सौ. शोभा मधुकर शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच बापूराव पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शोभा शिंदे यांची वर्णी लागली.
या निवडीनंतर रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या हस्ते शोभा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रयत कारखान्याचे संचालक प्रदिप पाटील, सरपंच संगीता माळी, ग्रामपंचायत सदस्य दादासो पाटील, अजित कदम, गणेश पाटील, बापूराव पाटील, संगीता पाटील, ग्रामसेवक शरद चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उदयसिंह पाटील म्हणाले, सर्वसामान्य लोकांना सत्तेत बसविण्याचे काम स्व. विलासराव पाटील- काका यांनी केले. रयत संघटना तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या कष्टातून उभी राहिली आहे. त्यामुळेच काका वारसदार म्हणून सर्वसामान्य लोकांना सत्ता मिळावी, यासाठी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहीन. लोकांचा विकास हाच अजेंडा सत्तेतील प्रत्येकाने राबविला पाहिजे.